माझ्यासारखा लिहिणारा ! Writer like me !

-------------------------------------------------------------------
माझ्यासारखा लिहिणारा
वाचण्यासारखं काहीतरी..... 
 ✍️रहस्याच्या शोधात निघालेल्या आणि आपली खरी ओळख तयार करणाऱ्या व आपल्या ज्ञानाचा सर्वांना उपयोग करण्याचं ध्येय उराशी बाळगून स्वार्थी दुनियेच्या बाहेर पडलेल्या सर्व प्रिय मित्रांना / आप्तेष्ठांना / स्ने
हीजणांना / आणि इतर लोकांना ज्यांचं नाव घेणं भीतीपोटी किंवा लाजेपोटी वर्ज्य आहे._ अशा सर्वांना हा
लेख अर्पण ✍️
     आपल्या आवडत्या व्यक्तीने आपली स्वतःहून विचारपूस 
अथवा चौकशी केली असता खुप छान वाटतं. आपल्या मागे
कोणीतरीआहे याचं खरं भान आपल्याला प्रकर्षाने नेहमी असतं. पणकदाचित हा कालखंड कोणता आहे कोण जाणे ज्यात कोणालाच...... कशाची पर्वा नाही. जनतेला कितीतरी वर्षाच्या मेहनतीने मिळालेलं ज्ञान youtube वर दोन मिनिटात ऐकून विसरून जायची सवय लागली आहे.      
           माझ्यासारखा लिहिणारा लिहिण्याचं काम नेहमी करेल घेणारे किती घेतील आणि वाचणारे किती वाचतील हे खुप महत्वाचं आहे !
            वर्तमान जीवनातच बऱ्याच अशा गोष्ठी असतात ज्या आपणाला माहीत नसतात व हिंस्त्र / अमानुष शर्यतीत आपण हे सर्व मात्र विसरून जातो अथवा कदाचित आपल्याला खरंतर त्या गोष्ठींचं भानंच नसतं असं मला वाटतं. 
          आपल्याला मिळालेली पद आणि प्रतिष्ठा तसेच आपण ज्या पेशात काम करत आहोत तो आपल्यासाठी योग्य आहे का किंवा आपल्या लायकीचा आहे का असं आपण कधी स्वतःला विचारलेलं आहे का?  हो स्वतःच विचारा ! कारण दुसऱ्याने विचारल्यावर तुम्ही आगीपेक्षाही भयंकर होऊन जातात. तुमच्या पेशाची खरंच कुणाला तरी गरज असते हो ! मि काय म्हणतोय लक्षात घ्या. पेशाची ( पद ) गरज ! अर्थात त्या पदावर काम करणारा त्या लायकीचा असल्यावर ज्याला गरज आहे त्याची गरज नक्कीच पूर्ण होईल. पण जर पदाच्या साच्यात नं बसणारं दुसरंच काही बोगस मटेरियल असेल तर त्या गरज असणाऱ्या व्यक्तीची अपेक्षा पूर्ण होणं लांबच ! पद  आणि सन्मानाला नाव ठेवून उपयोग नाही कारण ते चांगल्या आणि त्या पातळीवरच्या माणसाला देणं कबूल झालेलं असतं जे खरंच त्या साच्यात बसतात..... पण आजची आणि पुढची परिस्थिती वेगळी आहे आणि असेल. ज्यात ज्ञान घेणाऱ्यांचं अमाप नुकसान आणि नुकसान आहे. *माझ्यासारखा लिहिणारा* लिहिण्याचं काम करेल पण घेणारा किती घेतो आणि वाचणारा किती वाचतो हे खुप महत्वाचं आहे ! 
 धन्यवाद
 काही चुकलं असेल तर सर्वांची माफी आधीच मागून घेतोय कारण सत्य नेहमी कडू असतं
ले. शुभम तुपे 
                    ⚠️ DISCLAIMER ⚠️
कोणाला दुखावण्याचा कोणताही उद्देश्य नाही. फक्त वर्तमान परिसथितीचं वर्णन केलेलं असुन कोणीही वयक्तिक घेऊ नये. पटल्यास share करा नाहीतर सोडून द्या. 
 😊 आनंदी जगण्याचं रहस्य 😊

 रहस्याच्या शोधात
Alo watch this 


1 comment:

Post a Comment

नमस्कार,
भारतीय अस्मिता टीमकडून आपले स्वागत
आपण आमच्या पोस्ट वाचून सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. अशाच नवनवीन माहितीसाठी blog वर येत जा.
धन्यवाद
भारतीय अस्मिता टीम
( शुभम तुपे, भाग्यश्री न्याहारकर, अनिकेत राऊत, हर्षद वाघमारे, सचिन वाघ )