लेखणी - मित्रांनो तुम्ही मला विसरलात का?

लेखणी - मित्रांनो तुम्ही मला विसरलात का?  
लेखणीची किंमत ज्याला कळते तो माणूसच भाग्यवान समजावा. कारण त्याच्या लेखणीतून नेहमी शब्दरूपी अमृताचा झरा वाहत असतो. कदाचित पूर्वी प्रचंड ग्रंथसंपदा होती. मराठीत तसेच जगातील प्रत्येक भाषिक लोक आपली लेखणी साहित्याच्या मनोऱ्यांतून दर्शवत होते. काळ जसजसा सरत गेला तशे साहित्याचे मनोरे कमी पडायला लागले कारण माझ्या तरुण भारताचा हात डिजिटल साधनांनी पकडून ठेवलाय. हो ! खरंच ! कारण तुम्ही काही दिवस डिजिटल साधनांचे मालक होते आणि सध्यपरिस्थितीत आपण गुलाम आहात !गुलाम ! गुलाम ! कदाचित भविष्यात डिजिटल पेनचाच शाळांमध्ये वापर होईल कारण आजची परिस्थिती बघितली तर माझ्या लाडक्या, प्रेमळ लेखणीची जागा त्या एका भावना नसलेला.......... ने घेतली आहे. हो माझ्या लेखणीला भावना आहेत, कारण माझ्या हृदयाचा नातं मी लेखणीसोबत जोडलेलं आहे. माझं तरुणांना आव्हान आहे कि भारतामध्ये अखंड साहित्यसंपदा तयार व्हावी ह्यासाठी आपण पुढे यावं. जे ज्ञान शंभर रुपयाच्या पुस्तकातून सहज मिळत होतं आज त्यासाठी मोठे मोठे कार्यक्रम, conference, workshops, training programmes करावे लागतात कारण आम्हाला भविष्यात होणाऱ्या interviewसाठी प्रमाणपत्रांची गरज असते. आणि हे कार्यक्रम मोफत किंवा गरीब विद्यार्थी करू शकेल इतक्या रक्कमेचे नसतात. आम्ही तरुणांनी लेखणी सोडली म्हणुन साहित्य धोक्यात आलं मग ते भाषिक साहित्य असो वा वैज्ञानिक साहित्य असो पण ज्ञानाची क्षेत्रे कुठेतरी बदलत जात आहे. आणि म्हणुन गरजेनुसार लोकांनी त्यांचे व्यवसाय सुरु केले कारण आम्ही तरुणांनी हात गाळले आहेत. ही परिस्थिती आहे त्या जागेवर सध्यातरी बरी आहे नाहीतर भविष्य अवघड आहे, माझी लेखणी तरुणांची वाट पाहत आहे, पुन्हा सळसळते हात मारण्यासाठी नाही तर लिखाणासाठी उठले पाहिजेत, तुमच्या लिहिण्याने एखाद्याचं आयुष्य उजाड नाही तर उजळलं पाहिजे, माझा भारत साहित्य क्षेत्रात पुन्हा सक्षम झाला पाहिजे !

धन्यवाद 

             शुभम तुपे 
कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय प्रवरा, लोणी.

3 comments:

KISHOR Sangale said...

खूप छान सर

Gene Plus Agri said...

धन्यवाद

Digambar Hinge said...

खुप छान शब्दात मांडणी केली आहे- आजचे डिजिटल युग आणि लेखणी

Post a Comment

नमस्कार,
भारतीय अस्मिता टीमकडून आपले स्वागत
आपण आमच्या पोस्ट वाचून सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. अशाच नवनवीन माहितीसाठी blog वर येत जा.
धन्यवाद
भारतीय अस्मिता टीम
( शुभम तुपे, भाग्यश्री न्याहारकर, अनिकेत राऊत, हर्षद वाघमारे, सचिन वाघ )