शिक्षक विद्यार्थी विश्व : प्राचीन भारत ते आधुनिक भारत अशी वाटचाल.


    

 


शिक्षक विद्यार्थी विश्व : 

प्राचीन भारत ते आधुनिक भारत अशी वाटचाल

(इतिहासाची आठवण करून देणारे कमालीचे शब्द व वर्तमान परिस्थितीला उद्देशून केलेलं अचूक वर्णन ).



शिक्षक विद्यार्थी विश्व : प्राचीन भारत ते आधुनिक भारत अशी वाटचाल.

                   प्राचीन भारतात गुरूकुलात राहण्याची पद्धत होती,विद्यार्थी आपल्या गुरूच्या कुटुंबाचाच एक भाग बनून राहत असत.आपल्या विद्यार्थ्याला घडवण्यासाठी संपूर्ण जबाबदारी गुरू घेत असत.त्या बदल्यात विद्यार्थी त्यांना गुरूदक्षिणा देत.विद्यार्थ्यांसाठी गुरू परमेश्वरासमानच असत.गुरूंविषयी आदर असल्याशिवाय शिक्षण पूर्ण होऊ शकत नाही.शाळेतील शिक्षक ,आपली आई किंवा आपले प्राचार्य कोणीही आपले गुरू असू शकतात.जो ज्ञान देतो तो गुरू.ज्ञान आणि सृजन जर खाणीत दडलेल सोनं असेल तर गुरू म्हणजे ते सोनं खाणीबाहेर काढण्यासाठी परिश्रम घेणारी व्यक्ती होय.

              परंतु आजकाल तर नव्ह्यान्नो टक्के लोक सोन्याला खाणीबाहेर काढण्यासाठी प्रयत्नच करत नाही.का?.....कारण ते फक्त स्वत:साठी जगतात.त्यांना ते स्वत:म्हणजे संपूर्ण जग वाटत.याच कारणामुळे आज भारत आत्मनिर्भर बनण्यापासून मागे आहे.

              आजच्या पिढीला तर शिक्षकांची काही गरजच नाही राहिलीय जणू!....कारण आजकाल सगळं काही डिजिटल झालय ना!आजकाल कोणी साधा वर्तमानपत्र वाचत नाही.काय म्हणे मोबाईलमधे बघता.....खरचं ?.....नक्की बघता ना पण?......तसेच आजकाल पुस्तक लिहायचं सोडाच पण साधे पुस्तक सुद्धा कोणी वाचत नाही पण सोशल मीडियावरील मेम्स,कविता,व्हिडीओ हे वाचण्यात आणि आपल्या मित्र-मैत्रिणींना टँग करण्यात आपला वेळ घालवता.या सर्वांचा उपयोग काय याचा कोणी विचारच करत नाही.या सर्वांचे आपल्या जीवनावर काय परिणाम होताय हे कुणाच्या लक्षातच येत नाहीये.

              नागरिकांच्या कृतिशीलतेतून किंवा कृतिहीनतेतून एखादं राष्ट्र आपलं आत्मचरित्र लिहीत असत.आता निर्णय आपल्याला घ्यायचाय,आपण समस्येच्या उत्तराचा भाग आहोत की समस्येचा?आणि जर आपण उत्तराचा भाग नसू तर आपण आपोआप समस्येचाच भाग बनतो हे निश्चित!.....

              कधी कधी मला असाही प्रश्न पडतो कि,काय आजची पिढी भारत देशाला आत्मनिर्भर बनवू शकेेल?..........होय,बनवू शकेल पण केव्हा जेव्हा आपण सोशल मीडियाचं व्यसन सोडून आपल्या स्वप्नांवर लक्ष केंद्रित करू तेव्हा...,जेव्हा आपण आपल्या वाईट सवयी सोडून देशाचे एक चांगले नागरिक म्हणून वावराल तेव्हा.....,जेव्हा आपण 'हे विश्वचि माझे घर' हे सत्यात उतरवशाल तेव्हा.....तेव्हा सगळं काही शक्य आहे.

                  पटतंय ना?.....

                 चला तर मग सगळ्यांनी एकत्र येऊया,भारत देशाला आत्मनिर्भर बनवूया!

      जय हिंद जय भारत!धन्यवाद!

भाग्यश्री अशोक न्याहारकर 
कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, लोणी. 



6 comments:

Post a Comment

नमस्कार,
भारतीय अस्मिता टीमकडून आपले स्वागत
आपण आमच्या पोस्ट वाचून सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. अशाच नवनवीन माहितीसाठी blog वर येत जा.
धन्यवाद
भारतीय अस्मिता टीम
( शुभम तुपे, भाग्यश्री न्याहारकर, अनिकेत राऊत, हर्षद वाघमारे, सचिन वाघ )