काहीसं मनातलं......


आजकाल लोकं Formality करण्यात expert झालेत,नाही का?.....
              एकाच कुटुंबात,एकाच घरात वाढलेले भाऊ त्यात एका जणाचा वाढदिवस असतो.आजकाल सगळीकडेच फँमिली ग्रुप्स असतात.यांचाही असतो.सकाळी सकाळी ग्रुप वर शुभेच्छांचा वर्षाव होतो.सगळे ग्रुप वर शुभेच्छा देतात,स्टेट्स ठेवतात,परंतु कोणी स्वत:हून त्यांना शुभेच्छा देत नाही.का?कारण आहे फोन.फोन तर आजकाल प्रत्येकाकडेच झालाय हा तर विषयच नाही.Formality मुळे आपलेपणा सुद्धा संपलाय.
              'Formality',म्हणजे एखाद्याचा वाढदिवस आला,लग्नाचा वाढदिवस,कुणाचा सत्कार झाला,कुणाला बक्षिस मिळाले,कुणाला नोकरी लागली,तर लगेच व्हाँट्सअँपवर स्टेटस ठेवणे,इंस्टाग्राम,फेसबुकला स्टोरी टाकणे,ती पाच-पाच मिनिटाला चेक करणं,किती जणांनी माझी स्टोरी बघितली ते चेक करणं आणि हो सर्वात महत्वाचं म्हणजे त्याचं caption,तेतर विचारूच नका.I missed you,i love you,i missed you so much आणि काय काय आणखी बरच काही ...बापरे! बरं हे सगळे यांना वाढदिवसाच्या दिवशीच कसं सुचतं काय माहित.असं काहीच नसतं कुणालाही तुमची आठवण येत नसते.ती फक्त Formality असते,मी असं म्हणत नाही की सगळेच Formality करतात.हो काही लोकं असतात ते खरचं मनापासून करतात,वाटलंच तर फोन करून शुभेच्छाही देतात.
                आणि हो स्टेट्स वगैरे ठेवण्यापेक्षा त्यांना साधा फोन करा,खूप सार्या शुभेच्छा द्या.तोंडभरून त्यांच्याशी बोला.म्हणजे त्यांना छान वाटेल.पण नाही Formality कोण करेल?......स्टेट्स कोण ठेवेल,ते स्टेट्स किती जणांनी पाहिलं हे कोण चेक करेल.किती वाजेला पाहिलं हे सुद्धा चेक करतात काही महाशय!..कशासाठी?........कशासाठी करतायं पण हे सगळं?काय भेटतयं त्यातून याचा नक्की विचार करा.
                जर तुमची खूपच ईच्छा असेल ना! तर निदान caption तरी शोभेल असं टाका.जे तुमच्या आतून येईन असे काहीतरी शब्द टाका.उगाच कशाला काहीही टाकून स्वत:चा वेळ दवडताय.
                 काही महाशय तर असेही असतात आणि स्टेटस ठेवण्यासाठी चक्क रात्री बारापर्यंत जागे असतात.एव्हढे करण्यापेक्षा बारा पर्यंत अभ्यास करा आणि बाराला त्यांना फोन करा.त्यांच्याशी प्रेमाने बोला.आपुलकी बाळगा.आपलेपणा जपा आणि हो परत एकदा सांगते Formality करणं बंद करा!
                पटलं तर घ्या!
                 धन्यवाद!
-भाग्यश्री अशोक न्याहारकर,
कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालय,लोणी प्रवरा.

1 comment:

Post a Comment

नमस्कार,
भारतीय अस्मिता टीमकडून आपले स्वागत
आपण आमच्या पोस्ट वाचून सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. अशाच नवनवीन माहितीसाठी blog वर येत जा.
धन्यवाद
भारतीय अस्मिता टीम
( शुभम तुपे, भाग्यश्री न्याहारकर, अनिकेत राऊत, हर्षद वाघमारे, सचिन वाघ )