आचार्य चाणक्य आणि मनाला पटणाऱ्या इतर गोष्ठी.








आचार्य चाणक्य हे इतिहासातील महान शिक्षक होऊन गेले. इतिहासात जेव्हा महान सम्राट चंद्रगुप्त मौर्य यांचं नावं घेतलं जातं तेव्हा अर्थशास्रातील महान आचार्य यांचं नावं येतंच. अखंड भारताचं स्वप्न पाहून ते सत्यात उतरवण्याचं महान कार्य त्यांनी केलं. महान चक्रवर्ती सम्राट अशोक यांना सुद्धा त्यांनी मार्गदर्शन केलं. इतिहासातील हा पर्व अविस्मरणीय आहे. जेव्हा जेव्हा इतिहासातील हा क्षण आठवतो तेव्हा अंगावर रोमांच येते. ती परिस्थिती आणि ते क्षण, आचार्यांनीं केलेलं मार्गदर्शन, ते रात्रीचे क्षण, हे सर्व कमालीचं आहे. आचार्य चाणक्यांनी "चाणक्य नीती " हा ग्रंथ लिहिला ज्यात अर्थशास्त्र, राजनीती आणि इतर गोष्ठींवर भाष्य केलं आहे. इतिहास घडवण्यासाठी इतिहासाची पाने चाळावीच लागतात का?  कि नाही?  हा तर मला पडणारा प्रश्न आहे. मग इतिहासात नावं कोरण्यासाठी कोण्या गुरूचीच आवश्यकता असते का?  पण इतिहासातील अजरामर महान व्यक्ती जेव्हा जेव्हा आठवतात तेव्हा तेव्हा चेहऱ्यासमोर गुरूंनी दिलेली साथ किती महत्वाची होती हेही कळते. मग आज इतिहास बनवण्याची उमेद भारताच्या वीरांमध्ये नाहीत का?  कि आज आम्ही फक्त आमची मर्दानगी स्त्रीयांवरच दाखवतोय कि काय? ठीक आहे ! पण जे कृत्य या देशात होत आहे ते अयोग्य आणि........ आहे. 
         मला इतिहासाची झालर अंगावर चढवावी लागेल तेव्हा कुठेतरी भरकटलेले भानावर येतील. महान सम्राट चंद्रगुप्त मौर्य, चक्रवर्ती सम्राट अशोक, सम्राट बिंदुसार, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, झांसी कि राणी लक्ष्मीबाई, आणि अनेक महान सम्राट, राजे यांच्याकडून प्रेरणा घेऊन आणि त्यांनी दिलेले आदर्श आणि त्यांचे नियम आपल्याला घडवण्यासाठी आहेत.मि काही जास्त खोलून सांगत नाही, तुम्हाला कळलं असेल मला काय म्हणायचंय ते. 

धन्यवाद 

शुभम तुपे 
युवा लेखक 
College of agricultural  biotechnology, loni. 

1 comment:

Post a Comment

नमस्कार,
भारतीय अस्मिता टीमकडून आपले स्वागत
आपण आमच्या पोस्ट वाचून सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. अशाच नवनवीन माहितीसाठी blog वर येत जा.
धन्यवाद
भारतीय अस्मिता टीम
( शुभम तुपे, भाग्यश्री न्याहारकर, अनिकेत राऊत, हर्षद वाघमारे, सचिन वाघ )